जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोलाणी येथील २२ वर्षीय तरूणाने गुरूवारी दुपारी शेतात विषारी औषध घेतले. जिल्हा रूग्णालयात मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून तालुका पोलीसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ सुकदेव सपकाळे (वय-२२) रा. भोलाणे ता.जि.जळगाव हा आई वडीलांसह राहतो. भोलाणे शिवारात शेत असून शेती व मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. बुधवार १० मार्च रोजी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना शेतासाठी लागणारे विषारी औषध गोकुळ सपकाळेने घेतले. विषारी औषध घेतल्यानंतर तश्याच अवस्थेत गावात आला. त्याचा चुलतभाऊ जगदीश सपकाळे आपण विषारी औषध घेतल्याचे सांगितले. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताच्या पश्चात आई सुलाबाई, वडील सुकदेव सपकाळे, तुकाराम आणि मदन हे दोन मोठे भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दोन्ही मोठे भाऊ विवाहित असून कुटुंबासह ठाणे येथे राहतात. तर गोकुळ हा अविवाहित असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.