भोलाणे येथे भाऊबिजेच्या दिवशी बहिण-भावाने घेतले विष; बहिणीचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । भाऊबिजेच्या दिवशी बहिण-भावाने विषारी औषध घेतल्याची घटना तालुक्यातील भोलाणे येथे सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. यात बहिणीचा मृत्यू झाला असून भावाला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी, तालुक्यातील भोलाणे येथे राहणारे विश्वजित विजय सपकाळे (वय-२१) आणि अश्विता विजय सपकाळे (वय-१८) हे दोन्ही भाऊबहिण आईवडीलांसोबत राहतात. दोघे मुंबई येथे उच्चशिक्षण व नोकरी करत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दोघे बहिणभाऊ घरीच बसून काम व अभ्यास करत होते. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पिक फवारणीचे औषध घेतले. आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल दोघांनी का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. दोघांना अत्यवस्थ पाहून नातेवाईकांना तातडीने जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात हलविले. मात्र रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास अश्विताचा वाटेतच मृत्यू झाला. तर विश्वजित याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकाराबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content