यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायत मंडळाच्या नूतन नूतन निवड समिती व सल्लागार मंडळाची आज पाडळसे येथे झालेल्या सभेत घोषणा करण्यात आली.
भोरगाव लेवा पंचायतीची महत्वाची बैठक आज पाडळसे येथील संस्थेच्या कार्यालयात पार पडली. याप्रसंगी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्यासह आ. एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. राजूमामा चौधरी, खा. रक्षाताई खडसे, रोहिणी खडसे, विष्णू भंगाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या बैठकीत भोरगाव लेवा पंचायतीच्या नूतन नूतन निवड समिती व सल्लागार मंडळाची घोषणा करण्यात आली. या मंडळात आ. एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, आ. शिरीष चौधरी आणि एन.टी. पाटील (मलकापूर) यांचा समावेश करण्यात आला आहे.