भुसावळ प्रतिनिधी । सातपुडा शिक्षण मंडळ संचलित भुसावळ हायस्कूलच्या चेअरमनपदी विलास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड माजी चेअरमन जे.एच.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.
भुसावळातील सातपुडा शिक्षण मंडळ या संस्थेचे मागील ३० वर्षांपासून संचालक तसेच १३ वर्ष संस्थेचे सेक्रेटरीपदी कार्य केलेले आणि फैजपूर जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष विलास महारु महाजन यांची सोमवारी संस्थेच्या मासिक सभेत भुसावळ हायस्कूलच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सदरची सभा माजी चेअरमन जे.एच. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी बी.जी. सरोदे, माजी सेक्रेटरी डॉ. के.जी. झांबरे, माजी चेअरमन ए.एन. शुक्ला, एस.आर. झांबरे, एस.एस. चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक एच.डी.धांडे, सागर चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानातील शिक्षण मार्गदर्शन, शासकीय योजनेचा लाभ, शाळा सुंदर स्वच्छ करण्याचा मानस नवनिर्वाचित चेअरमन विलास महाजन यांनी व्यक्त केला.