Home क्राईम भुसावळ शहरात लॉन्स व मंगल कार्यालयांवर कारवाई

भुसावळ शहरात लॉन्स व मंगल कार्यालयांवर कारवाई


भुसावळ प्रतिनिधी । कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाही विवाह समारंभांमध्ये गर्दी जमत असल्यामुळे आज पोलीस प्रशासनातर्फे लॉन्स व मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली असून संबंधीतांना दंड ठोठावण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या आपत्तीमुळे विवाहांमध्ये शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र असे असले तरीही अनेक ठिकाणी विवाहांमध्ये गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आज प्रशासनाने खासगी विवाह समारंभांसह विविध मंगल कार्यालयांची झाडाझडती घेतली. यात स्टार लॉन, बालाजी लॉन, आदित्य लॉन, संतोषी माता हॉल आदींना दंड ठोठावण्यात आला आहे. याच्या जोडीला एका खासगी स्थळावरही विवाहाबाबतही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पोलीस स्थानकांचे निरिक्षक व अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत.


Protected Content

Play sound