भुसावळ येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

bhusaval karyshala 1

भुसावळ, प्रतिनिधी | येथील द वर्ल्ड स्कूल आई.सी.एस.सी. मध्ये नुकतीच मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थी जीवनात चांगल्या शिक्षणासोबत उत्कृष्ट मार्गदर्शन मिळणे फारच गरजेचे असते याचसाठी मंगळवारी (दि,२८) ७ वी ते १० वी च्या विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.

 

कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशनचे संचालक संदीप पाटील हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचा भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या क्षेत्रात अभिरुची ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रात कसे भवितव्य घडवावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

तसेच शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रोहित कोलते यांनीही त्यांच्या सी.ए. या व्यवसायाबद्दल विद्यार्थी व पालकांचे मनात असलेल्या शंकांचे निवारण करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सुशील दुबे यांनी केले.

Protected Content