भुसावळ येथे आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

भुसावळ – लाईव्ह  ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात “जळगाव विभाग अंतर्गत अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धे” चे आयोजन करण्यात आले. यात पुरुष संघात पी. जी. यु. जी. जिमखाना, जळगाव तर महिला संघात मू.जे. महाविद्यालय, जळगाव विजयी झाले आहेत.

 

 

श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा  १७  ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा पद्मा कोटेचा यांच्याहस्ते बुद्धिबळ खेळून करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, उपप्राचार्य  उपस्थित होते. या स्पर्धेत पुरुष १५ संघ आणि या संघात ४४ खेळाडूचा समावेश होता. महिला संघ ५  त्यात एकूण २२ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. याप्रसंगी भोळे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. संजय चौधरी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड फिडे पंच प्रवीण ठाकरे, संजय पाटील, नथ्थू सोमवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

जळगाव विभाग अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे… ( पुरुष व महिला)

पुरुष सांघिक स्पर्धेचा निकाल प्रथम विजयी संघ –

पी.जी.यु.जी जिमखाना, जळगाव उपविजयी –  पी.ओ. नहाटा महाविद्यालय, भुसावळ, तृतीय  क्रमांक  – फार्मसी महाविद्यालय, जामनेर.

महिला सांघिक विजयी स्पर्धेचा निकाल  – प्रथम क्रमांक –  मू.जे. महाविद्यालय, जळगाव, द्वितीय क्रमांक  – डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय, भुसावळ, तृतीय क्रमांक –  श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ

पुरुष ( वैयक्तिक ) स्पर्धा प्रथम क्रमांक –  संजय कासार –  नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, द्वितीय क्रमांक – आकाश धनगर केसीई बीपीएड, जळगाव, तृतीय क्रमांक – अनिकेत शिरोळे साने गुरुजी विद्या प्रबोधनी बी.एड्, खिरोदा, चतुर्थ क्रमांक  – अशोक सोनवणे पी.ओ. नहाटा महाविद्यालय, भुसावळ, पाचवा क्रमांक –  अनिकेत जायस्वाल-  पी.ओ.नहाटा महाविद्यालय, भुसावळ.

महिला ( वैयक्तिक ) स्पर्धा  प्रथम क्रमांक  – साक्षी शुक्ला मनियार लॉ कॉलेज, जळगाव, द्वितीय क्रमांक  – सानिया तडवी मू. जे. महाविद्यालय, जळगाव, तृतीय क्रमांक – रिद्धी भारिया, मू. जे. महाविद्यालय, जळगाव, चतुर्थ क्रमांक – श्रुती पाखरी, डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव, पाचवा क्रमांक  – कांचन शर्मा, जी एच. रायसोनी, जळगाव.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. वाय. डी. देसले यांनी केले. सदर स्पर्धेसाठी मुकेश पवार, प्रा.किरण नेहते, डॉ. नवनीत अस्थि, प्रा.डॉ. अनिता नारखेडे, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. विजय महाजन तसेच उपप्रचार्य डॉ. व्ही एस पाटील, प्रवीण कोल्हे, प्रा. अख्तर रखान ,महाविद्यालय क्रीडा समिती सदस्य प्रा. एस.डी. वंजारी, प्रा. दिपाली पाटील, प्रा.ए.एम. निकम यांनी सहकार्य केले.

 

Protected Content