Home आरोग्य भुसावळ बाजारपेठचा आणखी एक पोलीस कर्मचारी कोरोना बाधीत

भुसावळ बाजारपेठचा आणखी एक पोलीस कर्मचारी कोरोना बाधीत

0
76


भुसावळ प्रतिनिधी । येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अजून एक कर्मचारी कोरोनाने बाधीत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानक हे कोरोनासाठी हॉटस्पॉट झाल्याचे दिसून येत आहे. आधी येथील दोन कर्मचारी बाधीत झाले होते. तर एकाचा यामुळे मृत्यू झाला होता. यानंतर काल एकाच वेळी तब्बल आठ सहकारी पोलीस कर्मचार्‍यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली होती. या सर्वांना शहरातील रेल्वे कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच बाजारपेठ स्थानकाचाच अजून एक कर्मचारी कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट आला आहे. यामुळे या पोलीस ठाण्यातील कोरोना बाधीतांची संख्या १२ झाली असून एक कर्मचारी मयत झालेला आहे.


Protected Content

Play sound