भुसावळ, प्रतिनिधी । शहरात कोरोना एका विस्फोटा सारखा वाढत असून वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आज दि.६ जुन पासून, वार्ड क्र. १२ मध्ये सर्व नागरिकांचे शरीराचे तापमान व आॅक्सीजन तपासण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रभागातील सुंदर नगरात कोरोना बाधित रूग्ण सापडून ५ दिवस उलटले तरीही शासनाच्या नियमानुसार अद्याप पर्यंत हा परिसर सील करण्यात आला नाही. उपाययोजना करण्यात न आल्याने माजी नगरसेवक,सभापती तथा रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी यांनी क्षेत्रिय अधिकारी दिलीप चौधरी यांचे सहकारी कर्मचारी व आशा वर्कर यांना सोबत घेत प्रभागातील नागरिकांची मशिनव्दारे ताप व आॅक्सीजनची तपासणी केली. या कंटेनमेंट झोनमध्ये नेट पार्सलचे दोन कार्यालय सुरू असून त्यात बाहेरील कामगार काम करीत आहे. ते बंद करण्यात यावे.परिसर तात्काळ सील करून उपाययोजना राबवण्यात यावी. या पुढे, कोणत्याही नागरिकाला सर्दी,ताप,खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास असेल त्यांनी लवकरात-लवकर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना सुचवावे, जेणेकरून त्यांच्यावर उपचार करून त्यांना लवकर सुखरूप घरी परत आणता येईल, असे आवाहन राजु सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले.