भुसावळ प्रतिनिधी । दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ विभागातील पाचही तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरात सायकल रॅली काढण्यात आली.
भुसावळ शहरात शिवसेनेने सायकल रॅली काढली. अष्टभुजा देवी मंदिराजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर रॅलीला सुरुवात झाली. शिवसेना, युवासेना, अल्पसंख्यांक आघाडी, रेल कामगार सेना, शिक्षक सेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, दिव्यांग सेना पदाधिकारी व कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. या रॅलीतून मतदान जनजागृतीचा संदेश देण्यात आला.