Home Cities भुसावळ भुसावळात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम (व्हिडीओ)

भुसावळात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम (व्हिडीओ)


भुसावळ प्रतिनिधी । शिवसेनेच्या ५४व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजता शहरातील टिंबर मार्केट जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शहरप्रमुख निलेश महाजन व माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत परीसर दणाणून सोडला होता.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या प्रभागात वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, लक्ष्मी चौक परिसरामध्ये सँनेटायझर मशीनचे लोकार्पण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन यांनी म्हटले आहे. ज्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये शिवसेना स्थापन केली होती, त्याच एकनिष्ठेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे, असे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी म्हटले आहे. यावेळी जग्गु खराडे, संदिप पाटील, शरद जोहरे, राजु चौधरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/watch/?v=643584836370331

 


Protected Content

Play sound