भुसावळ, प्रतिनिधी । शहरात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जामनेर रोड ते नाहाटा चौफुली, खडका चौफुली ते रजा टॉवर या भागात पेट्रोलिंग दरम्यान रस्त्याच्या कडेला विना नंबर व फॅन्सी आठ मोटरसायकली जप्त केल्या असून मोटरसायकलच्या मालकांना कागदपत्रे आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भुसावळ शहरात गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी विना नंबरची मोटरसायकल वापर करीत आहेत. मंगळसूत्र चोरी, घडफोडी, दरोडे यासारखे गुन्हे घडत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी दररोज विना नंबरची मोटरसायकल वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विना नंबर व फॅन्सी मोटरसायकल पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा केल्या आहेत. तसेच मोटरसायकल मालकांना कागदपत्र घेऊन आणण्यास सूचना दिल्या व फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांना त्वरित नंबर प्लेट बदलण्यास सांगितले. कारवाईस सामोरे जायचे नसेल तर आपल्या मोटरसायकलींवर नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. जेणे करून याचा फायदा शहरातील नागरीकाना होणार आहे. जर एखाद्या परिसरात कुठली घटना घडल्यास ताबडतोब गुन्हेगारांचा मोटरसायकल नंबर टिपता येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय भदाणे, आयज सैय्यद,पोना दिपक पाटील, उमेश पाटील, रमण सुरळकर, पोकॉ ईश्वर भालेराव, योगेश महाजन, जीवन कापडे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, योगेश माळी यांच्या पथकाने केली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2896307837362540