भुसावळ प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या मंडळ येथे मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी आंतर विभागीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या आपल्या कामात असतांना आपली कला जोपासता यावी, यासाठी राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्राथमिक फेरी भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती.
मध्य रेल्वेतील मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आदी मंडळी मंडळातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामधून निवडलेले तीन स्पर्धक वाराणसी येथे होणाऱ्या भारतीय रेल्वे स्तरावरील स्पर्धेत सहभागी होतील. ह्या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे चंद्रप्रकाश प्रथम क्रमांक, राजेंद्र जावळे द्वितीय क्रमांक, उदय कुमार तृतीय क्रमांक, स्पर्धेचे परीक्षक जी.एस. सरनाईक, प्रकाश दलाल आणि सतीश कुलकर्णी हे होते. विजेत्यांवर सर्व रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे चित्रप्रदर्शन कर्मचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. आज विवेक कुमार गुप्ता डीआरएम , मनोज कुमार सिन्हा ए.डीआर.एम, एन.डी.गांगुर्डे, सीनी डीपीओ तसेच इतर रेल्वे शाखा अधिकाऱ्यांनी भेट दिली. विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर.एच.परदेशी, एपीओ आणि संपूर्ण कार्मिक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.