भुसावळ प्रतिनिधी । येथील डीआरएम कार्यालयात कार्यरत असणार्या अधिकार्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या पार्थिवावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
भुसावळ शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहराच्या खालोखाल भुसावळात रूग्ण आढळून येत असून कोरोनाची बाधी झालेल्यांच्या मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. या पार्श्वभूमिवर, डीआरएम ऑफिसमध्ये कार्यरत असणार्या ५४ वर्षाच्या अधिकार्याचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, संबंधीत अधिकार्याच्या संपर्कात असणार्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे.