भुसावळ, प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस भुसावळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारत माता, स्व.पंडित दिनदयाल उपाध्याय , स्व. डाॅ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची प्रतीमा पुजन करत घरावर भाजपाचा ध्वज फडकवून साजरा करण्यात आला.
दि. ६ एप्रील १९८o या दिवसी भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली होती. या स्थपना दिनानिमित्ताने पक्षाचे थोर विचारवंत व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर अध्यक्ष रजनी सावकारे, भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडी जिल्हा अध्यक्ष परिक्षीत बर्हाटे, भुसावळ शहर सरचिटणीस रमाशंर दुबे, पवन बुंदेले, भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्ष अमोल महाजन, अनिरुध्द, संदिप सुरवाडे आदी उपस्थित होते.