अपघातात जखमी झालेल्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी ।  ट्रकने रिव्हर्स घेतल्याने ट्रकच्या पाठीमागे उभा असलेला एका मजूराला धडक लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्या मजूराचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला आहे.  याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की,  रघुनाथ माधव शार्दुल (रा. नारायणवाडी ता. चाळीसगाव) येथे परिवारासह वास्तव्यास आहेत. रघुनाथ शार्दुल हा मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. भाऊ ज्ञानेश्वर शार्दुल याला सोबत घेऊन कामावर जात असताना १७ मार्च रोजी ७:३० वाजता धुळे रोडवरील पंकज एजन्सी जवळ ट्रकने (ट्रक.नं. एम.एच.१९ झेड- ५२५४) रिव्हर्स घेतला. पाठीमागे  रघुनाथ माधव शार्दुल उभा असल्याने ट्रकने त्याला धडक दिला. त्यात रघुनाथ माधव शार्दुल याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने भाऊ ज्ञानेश्वर शार्दुल याने लगेच पुढील उपचारासाठी जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी १०.३० वाजता प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे भाऊ ज्ञानेश्वर शार्दुल याने शहर पोलिस ठाणे गाठून अज्ञात ट्रक  चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सफौ अनिल अहिरे हे करीत आहेत.

Protected Content