भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बाबारामदेवजी मंदिराजवळ बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यास अटक केली असून त्याच्या ताब्यातील २ हजार ८०० रूपयांची दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार शहरातील बाबारामदेवजी मंदिराजवळ संशयित आरोपी कान्हा किशोर बडगुजर (वय-२२) रा.वाल्मिक नगर, भुसावळ हा बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज दुपारी १ वाजता भुसावळ बाजार पेठ ठाण्याचे सपोनि अनिल मोरे, सपोनि संदिप परदेशी, पो.ना. रविंद्र बिऱ्हाडे, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, पो.कॉ.कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्र्वर भालेराव, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे यांनी कारवाई करत बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असतांना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून २ हजार ८०० रूपये किंमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.दिपक जाधव करीत आहे.