भुसावळ प्रतिनिधी । कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यास आली आहे. याकाळात खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहे. २६ एप्रिल रोजी रात्री उपचारासाठी ३ किलोमीटर वरून बाळाला घेऊन आलेल्या महिलेस दवाखान्यात उपचार करण्यास टाळाटाळ केली. महिलेने पोलीस स्टेशनला धाव घेताच बाळाच्या मदतीला पोलीस मामा धावताच डॉक्टरांनी उपचार केला.
अधिक माहिती अशी की, सरकारने खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या आहे. जर कोणी दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई केली जर असल्याचे आदेश निर्गमित केले आहे. यानंतरही भुसावळ शहरातील टिंबर मार्केट मधील ओम हॉस्पिटलमध्ये ३ किलोमीटर वरून रात्री १० वाजेच्या दरम्यान भाऊ-बहीण बाळाला घेऊन दवाखान्यात उपचारासाठी आले असता असिस्टंट डॉक्टर यांनी उपचार करण्यास टाळाटाळ केली. महिलेने विनंती करूनही उपचार करण्यास नकार देतात महिलेने बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. त्यांच्या सोबत झालेला प्रकार सांगताच भाऊ-बहीण बाळाला सोबत घेऊन पोलीस मामा स.फै.तस्लिम पठाण, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी दवाखान्यातील असिस्टंट डॉक्टरांची भेट घेतली.व ओम हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनव्दारे बोलणे केले त्यानंतर हे शक्य झाले फक्त खाकीतील पोलीस मामाच्या माणुसकी मुळे असिस्टंट डॉक्टरांनी बाळाचा उपचार केला.