भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बागवान जमात इस्लाई पंचकमिटी व यंग ग्रुप आयेाजित सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा बुधवारी पार पडला.
शहरातील बागवान जमात-इस्लाई पंच कमिटी व यंग ग्रुप भुसावल तर्फे बुधवारी मोहम्मदी नगर अल फरहान मशिदीत सकाळी ११:३० वाजता निकाह करण्यात आला. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भुसावळ, जळगाव, दोंडाईच्या, शिरपूर, तळोदा, माणगाव ,नाशिक ,अलिबाग, यातील वधूवरांनी सहभाग नोंदविला होता. बागवान जमात-इस्लाई पंच कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक हाजी इक्बाल (पहिलवान) बागवान, रफिक बागवान (आर.आर.), हाजी रशिद बागवान, शरीफ हसन बागवान, आसिफ बागवान, युसूफ बागवान, आशिक पहलवान, हाजी शब्बीर बागवान, इस्माईल चौधरी, हाजी शब्बीर सेठ या पंचकमिटी व यंग ग्रुपने सहकार्य केले. विवाह सोहळ्यासाठी १०० पेक्षा जास्त स्वयंसेवक नेमण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचेे शहराध्यक्ष नितीन धांडे, वासेफ पटेल, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, वाहतूक शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक सतीश सुरडकर, माजी नगरसेवक शे. साजिद , नगरसेवक दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.