भुसावळात पोलीसांचे पथ संचलन

भुसावळ प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व कोरोनाच्‍या पाश्वभुमीवर आज १४ एप्रिल रोजी अप्‍पर पोलीस अधिक्षक भाग्‍यश्री नवटके यांनी भेट देत पोलीस पथकासह डॉ. आंबेडकर पुतळा ते रजा टॉवर चौक पथसंचलन करुन शक्‍ती प्रदर्शन केले.

यात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे, तालुक्‍याचे रामकृष्‍ण कुंभार आदी उपस्‍थित होते. यावेळी अप्‍पर पोलीस अधिक्षक भाग्‍यश्री नवटके म्‍हणाल्‍या कि, कोरोना आजाराने जगभरात हाहाकार माजविला असतांना जळगाव जिल्‍ह्‍यातील नागरिक लॉकडाऊन काळात जागरुक राहील्‍याने जिल्‍हा कोरोनाच्‍या आजारापासून दुर राहीला. आगामी ३ मेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढविला असून कोरोनाचा सामना करण्‍यासाठी मागच्‍या लाॅकडाऊन पेक्षा जास्‍त काळजी घेण्‍याचे आवाहन केले.

गौसीया नगरात पोलीसांवर फुलांची उधळण
देशभरात कोरोनापासून नागरिकांना वाचवण्‍यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र सज्ज असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पथकातील अधिकारी, कर्मचारी, आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी यांनी भारत सरकारने घेतलेल्या लोकडाऊनचा निर्णय २१ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत नागरिकांची रक्षा केल्याने गौसिया नगर भागातील यंग ग्रुपतर्फे फुलांची उधळण करून स्‍वागत करण्‍यात आले. आगामी लाॅकडाऊन सुध्‍दा यशस्‍वी करण्‍याचे आश्‍वान पोलीसांना दिले. यावेळी यंग ग्रुपचे मुक्‍तार मन्‍यार, मुस्तफा खाटीक, आबिद पिंजारी, जहांगीर मन्यार, वसीम शेख, आबिद पिंजारी, बिलाल शहा, रफिक शेख, अजिज शेख, रोशन पिंजारी, आसिफ खान, मुक्‍तार पटेल, इमरान शेख, जफर खान, सईद पटेल, अल्ताफ शेख, अकील शेख, इमरान मन्‍यार व गौसिया नगर भागातील नागरिक उपस्‍थित होते.

Protected Content