भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शनी मंदिर वार्डातील रहिवाशी हे किराणा दुकानांवर असतांना दोन आरोपींनी पिस्तुलचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजेश रमाशंकर दुबे राहणार शनी मंदिर वार्डातील असून किराणा दुकानावरती असतांना आरोपी बाबा काल्या पूर्ण नाव माहीत नाही तसेच रईस पूर्ण नाव माहीत नाही हे दोघे आले व कमरेमधून पिस्तुल काढली दुबे यांनी आपले हातवर करून पळू लागले दुबे यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा एस 8 मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले.घटनास्थळी मा. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती जाणून घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरनं 667/ 2020 भा.द.वि.कलम 394, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहे.