भुसावळ : प्रतिनिधी । शहरात गेल्या ६ महिन्यात नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून पोलिसांनी ७१ लाखांपेक्षा जास्त रकमेचा दंड वसूल केला आहे
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे वर्दळ असून काही बेशिस्त वाहनचालक यांच्याविरुद्ध मोहीम सुरू करून उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड ( शहर वाहतूक शाखा ) यांच्यासह वाहतूक शाखेचे कर्मचारी यांचे मदतीने जानेवारी ते जून या कालावधीत 31 हजार 372 वाहन धारका विरुद्ध कारवाई करण्यात आली 71 लाख 83 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. 6 लाख 09 हजार ,500 रुपये पेंडिंग दंड वसूल करण्यात आलेला आहे.
जानेवारी ते जून 2021 या कालावधीत मोटर वाहन कायदा कलमान्वये 32,905 केसेस करण्यात आलेले आहेत.
रहदारीला अडथळा निर्माण करणे 250 केसेस, वाहन चालवण्याचा परवाना जवळ न बाळगणे 13,139 केसेस, ट्रिपल सेट वाहन चालवणे 1053 केसेस, फ्रंट सीट बसविणे 89 केसेस,वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे 602 केसेस, वाहनास नंबर न टाकणे फॅन्सी नंबर प्लेट 786 केसेस, विना गणवेश 1405 केसेस, विना हेल्मेट 1372 केसेस, सीट बेल्ट न लावणे 734 केसेस, इतर मोटर वाहतूक कायदा कलम अन्वये 13,475 केसेस असे एकूण सहा महिन्यात 71,83,200 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. यापुढेहि अशी कारवाई चालूच राहणार आहे
सध्या covid-19 या प्रादुर्भाव चालू असल्याने शहरातील नागरिक यांना आवाहन व मार्गदर्शन करण्यात येत असून वाहतुकीचे नियम पाळावे विनाकारण बाहेर फिरू नये बाहेर फिरतांना वाहन चालवताना नेहमी मास्क लावावा व स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.