भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता आठवर पोहचली असून यात शांतीनगर परिसरात वास्तव्यास असणार्या एकाच घरातील तिघांचा समावेश आहे.
गुरूवारी आलेल्या अहवालांमध्ये शहरातील ३८ वर्षाची महिला व तिचा १५ वर्षे वय असणारा मुलगा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हे मायलेक शांतीनगर भागातील रहिवासी आहेत. विशेष बाब म्हणजे या भागातील एक डॉक्टर आधीच कोरोना पॉझिटीव्ह असून हे दोन्ही जण त्यांचे पत्नी व मुलगा आहे. अर्थात, यामुळे शांतीनगर भागातील तिघे जण आता कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.