भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जळगाव रोडवर असणार्या हुंदाई शोरूमला फोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
याबाबत वृत्त असे की, शहरातील जळगाव रोडवर फोकस हुंदाई या कंपनीचे चारचाकी वाहनांचे शोरूम आहे. आज पहाटे हे शोरूम फोडल्याचे उघडकीस आले. यात चोरट्यांनी सीसीटिव्हीचे कॅमेरे तोडून दूर फेकून दिल्याचे दिसून येत आहे. कंपनीचे संचालक जळगाव येथे वास्तव्यास असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. यात चोरट्यांनी नेमका किती ऐवज लंपास केला हे मात्र समजले नाही.