भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब नमुन संकलनासाठी आज शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकुण ५२ जणांचे स्वॅब घेण्यात आले.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी आज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने व उपजिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबीरात एकुण ५२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. याप्रसंगी नोडल अधिकारी ॲङ तृप्त भामरे, डॉ. तोशीफ खान, लॅब टेक्नीशीअन श्री. लोखंडे, परिचारीका रेखा जाधव, पूनम इंगळे, लता गव्हाळे, नंदकिशोर भावसार, सचिन पवार, एन.जे.चौधरी, नगरपारिषदेचे पथक प्रमुख संजय बनाईत, पंकज पन्हाळे, विशाल पाटील, शेख परवेज अहमद, अनिल मांडवाडे, गोपाला पाली आदी सामाजीक कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/726555001222688/