भुसावळ प्रतिनिधी । शहरातील अनेक भागांमध्ये सध्या सुरू असणारा विजेचा लपंडाव थांबविण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे आज एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
आज रोजी काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे भुसावळ शहरातील विजेच्या समस्यांबाबत कार्यकारी अभियंता श्री.घारुडे साो.,मराविमं,वितरण कंपनी,यांना जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, भुसावळ शहरातील यशोदा हाँटेलमागील माता यशोधरा नगर,गणपूर्ति नगर,खडका रोडवरील मोहंन्मदी नगर या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दररोज दिवसातून पाच ते सहा वेळा लाईट ये-जा करत असल्याने व कधी कधी विज दाब अत्यंत कमी होत असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका मात्र येथील नागरीकांना पडत आहे.विजेच्या होत असलेल्या लपंडावामुळे या संपूर्ण परिसरातील नागरीकांच्या घरातील विद्युत उपकरणांवर विपरीत परिणाम होत असून नागरीक अक्षरश: नागरीक वैतागले आहेत.अगोदरच कोरोना या महामारीमुळे नागरीकांच्या मनात भिती असल्याने लाँकडाऊनमुळे बर्याचजणांचे व्यवसाय,उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.नवीन विज मिटरमुळे आधीच वीदबिल अव्वाच्या सव्वा येत असल्याने व त्यात वीजदाब कमी अधिक होत असल्याने नागरीकांच्या घरातील ट्युबलाईट,पंखे,टिव्ही,फ्रिज,इन्वहर्टर,आदि विद्युत उपकपणे बिघडत आहेत.त्यामुळे या एरीयामधील विजेचा होत असलेला लपंडाव त्वरीत बंद करुन वीजदाब सुरळीत करावा व नागरीरांना होत असलेल्या त्रासातुन मुक्त करावे अन्यथा आम्हाला लोकशाही पद्धतीने जनआंदोलन करावे लागेल असा इशारा जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी या निवेदनात दिला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील,जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, शहर उपाध्यक्ष तस्लीम खान, उपाध्यक्ष शैलेश अहिरे व दिलीप क्षीरसागर उपस्थित होते.