भुसावळातील दोघा भावंडांचा अपघाती मृत्यू

Untitled

भुसावळ प्रतिनिधी । भंडारा शहराजवळ मागून येणार्‍या वाहनाने दिलेल्या धडकेत गुरमीतसिंह बल आणि त्यांचे बंधू जगरूप सिंह बल यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

भुसावळ शहरातील बालाजी लॉन जवळील रहिवासी गुरमीत सिंह बल (वय ४०) आणि त्यांचे बंधू जगरुप सिंह बल (वय ३५) हे दोन्ही बंधू वाहनाने व्यवसायानिमित्त बिलासपूर येथे जात होते. त्यांची गाडी भंडारा शहरापासून काही अंतरावर असताना भिलेवाडा पेट्रोल पंपांजवळ पंक्चर झाली. या वेळी चाक बदलवत असताना मागून येणार्‍या एका वाहनाने दोन्ही बंधूंना जोरदार धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात काल सकाळी घडला. बल बंधूंच्या या अकाली अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content