भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा पायी हजारो किलोमीटर प्रवास करत आपापल्या घराची वाट धरल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर दिसून येत आहे. अशा परप्रांतिय मजुरांना शहरातील जे.के.ट्रेडर्सने मदतीचा हात दिला असून मजुरांसाठी चहा, पाणी, नाष्टा व जेवणाची सोय करून दिली आहे.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे परप्रांतिय मजूरांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. चौथा लॉकडाऊनमध्येही काही प्रमाणावर शिथिलता मिळाली आहे. तरीही परप्रांतिय मजूरांचे लोंढेचे लोंढे मिळेल त्या वाहन किंवा हजारो किलोमीटर पायी निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परप्रांतीय मजुरांना भुसावळाती जे.के.ट्रेडर्स यांच्या मार्फत मदतीचा हात दिला जात आहे. जे.के.ट्रेडर्सचे संचालक यांनी लॉकडाऊन झाल्यापासून परप्रांतीय मजुरांसाठी चहा, पाणी, नाष्टा व जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सोबत पायी चालणाऱ्या परप्रांतीयांसाठी चपलाची देखील सोय करून दिली आहे. तर ज्याच्याकडे गावी जाण्यासाठी पैसे नाहीत अशांना देखील त्यांनी स्वखर्चाने आतापर्यंत रवाना केले आहे.
भुसावळ शहरात कालपासून कलकत्ता येथील 15 ते 17 लोक जे .के ट्रेडर्स यांच्याकडे मुक्कामी आहेत. त्यांनी त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली असून गावी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याचे काम देखील ते करीत आहे. मात्र शासनाचा नुकताच आदेश आला आहे की फक्त शेजारील राज्यांतील मजुरांकरीता बस चालवण्यात येतील आणि राज्यापलीकडील मजुरांकरीता सोय करता येणार नाही. बंगालमधील सरकारने मजुरांना येण्याकरिता परवानगी दिली नसल्याने बंगाल करिता जाण्यासाठी रेल्वे सुद्धा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. बंगाल मधील सरकार मजुरांना घेण्यास असमर्थ असेल तर मजुरांनी बंगालमध्ये जाण्याची घाई न करता महाराष्ट्रातच आहे त्या ठिकाणी थांबून काम धंदे करावे असे जे.के. संचालकांनी म्हटले आहे. कलकत्त्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आमदार व तहसीलदार यांच्याशी बोलणे झाले असून जर त्यांच्या जाण्याची व्यवस्था होत असेल तर आम्ही स्वखर्चाने भाडे भरून यांना रवाना करणार असल्याचे जे .के. ट्रेडर्सचे संचालक यांनी म्हटले आहे. काही दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील दोन कॉलेज शिकणाऱ्या मुली पायी येत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्यांना स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले आहे .
यासाठी टिंबर मार्केट प्लाट होल्डर असोसिएशनचे कमलजीत सिंह गुजराल, अजित सिंह बेहरा, संजय काळे, सतिश उगले, पिंटु बोजराज, रवि वर्मा, विकास पाचपांडे, रवि ढगे, सचिन अग्रवाल,जगदीश पटेल, पंकज पाटील आदी परिश्रम घेत आहे.