भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर पोलीसांनी पोलीस पथकासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रजा टॉवर चौक,खडका रोड सह विविध भागात पथसंचलन करुन शक्ती प्रदर्शन केले.
या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,तालुक्याचे रामकृष्ण कुंभार आदी सहभागी होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड म्हणाले कि,कोरोना आजाराने जगभरात हाहाकार माजविला असून भुसावळ शहरात काही नागरिक लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करीत आहेत. कुणीही नियमांचा भंग केल्यास निश्चितच कारवाई होईल. देशभरात कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी शासन,प्रशासन व पोलीस यंत्रणा दिवसरात्र सज्ज असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.या पथकात अधिकारी,कर्मचारी, आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी सहभागी होते.