भुसावळातल्या गवळी वाड्या जवळचा कंटेनमेंट झोन उघडण्याची मागणी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील गवळीवाडा भागात कोरोनाचा एकही रूग्ण नसूनही येथील रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत असून यामुळे येथील कंटेनमेंट झोन उठविण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी प्रांताधिकार्‍यांकडे केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात ज्या ज्या भागा मध्ये कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तो भाग प्रशासनाने सील केला आहे. शहरातील गवळी वाड्यात कोरोनाचा रूग्ण नाही तरी देखील रस्ता बंद केला आहे. या रस्त्यावरील कंन्टेमेन्ट झोन काढण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सुतार गल्लीत कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने तो भाग सील केला आहे. मात्र मामाजी टाँकिज रोडवरील गवळी वाड्यात रूग्ण नसल्यावरही दोन्ही बाजुचा रस्ता सील केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.यामुळे नागरिकांना फिरून जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील कंन्टेमेन्ट झोन हटविण्यात यावे अशी मागणी गवळी वाड्यातील स्थानिक रहिवाशांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content