भुसावळ प्रतिनिधी । शहरातील समता नगर व सिंधी कॉलनी भागात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा शोध प्रशासनाने सुरू केला असून त्यांची कोविड रूग्णालयात तपासणी करण्यात येणार आहे.
भुसावळ शहरातील समता नगर भागातील एक महिला काल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. या पाठोपाठ आज सिंधी कॉलनी भागातील व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या दोन्ही व्यक्तीच्या कुटुंबियांसह त्यांच्या संपर्कात नेमके कोण आलेत याची माहिती आता जमा करण्यात येत आहे. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यात त्यांना बाधा झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली आहे. समतानगर मधील कोरोना बाधीत महिला ही जिल्हा कोविड रूग्णालयात दाखल होण्याआधी शहरातील एका हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी गेली होती. तेथील डॉक्टर व कर्मचार्यांनाही क्वॉरंटाईनचे निर्देश देण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, समता नगरच्या पाठोपाठ सिंधी कॉलनीतही रूग्ण आढळल्यामुळे भुसावळसह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००