भुसावळचे समाजसेवक पिंटू कोठारींतर्फे आरोग्यवर्धक काढ्याचे वाटप ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । कडक लॉकडाऊनमध्ये असंख्य गरजू आणि परप्रांतीय प्रवाशांसाठी देवदूत ठरलेले भुसावळचे नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी आता शहरासह तालुक्यात आयुर्वेदीक काढ्याचे वाटप सुरू केले आहे. या काढ्याचा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणार्‍या रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोग होत असून याला सेवाभावी तत्वावर उपलब्ध करण्यात आले आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन लागल्यानंतर अनेक लोकांना अडचणी आल्या. विशेष करून हातावर पोट असणारे गोरगरीब लोक आणि आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीयांना भयंकर आपत्तीला सामोरे जावे लागले. याच गरजूंसाठी भुसावळ येथील नगरसेवक, समाजसेवक तथा साईजीवन सुपर शॉपीचे संचालक निर्मल उर्फ पिंटू कोठारी हे देवदूत बनून धावून आले. जवळपास दोन महिन्यांपर्यंत त्यांनी दररोज किमान तीन-चार हजार प्रवाशांना अन्नदान केले, त्यांना गावाकडे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. शहरातील अनेक गरजूंना किराण्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामुळे बडे दिलवाला पिंटूसेठ असे म्हणत त्यांच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. यात अगदी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यापासून ते थेट अगदी रस्त्यावरच्या फाटक्या माणसाने त्यांच्या कार्याची वाखाणणी केली. आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता मिळून जनजीवन पूर्वपदावर येत असतांना पिंटू कोठारी यांनी आरोग्यवर्धक असा आयुर्वेदीक काढ्याच्या वाटपाच्या माध्यमातून समाजसेवेचा एक नवीन आयाम सुरू केला आहे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुंठ, लवंग आदींसह अन्य आयुर्वेदीक घटकाचा काढा करून नित्यनेमाने घेतल्यास याचा कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी उपयोग होत असल्याचे आधीच घोषीत केले आहे. या अनुषंगाने पिंटू कोठारी यांनी आपल्या साईजीवन सुपरशॉपीच्या माध्यमातून आयुर्वेदीक काढा तयार केला असून याच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढत असून याचा कोरोना व न्यूमोनियासारख्या विकारांवर लाभ होत असल्याचे नमूद करत याचे वाटप सुरू केले आहे. कोठारी हे स्वत: घरोघरी जाऊन याचे वाटप करत आहेत. हा काढा तसा खूप महाग असला तरी भुसावळकरांसाठी ना नफा-ना तोटा या तत्वावर याला साईजीवनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तर जवळपास ७० टक्के काढ्याची पाकिटे ते अगदी मोफत वाटप करत आहेत. कुणाला हा काढा हवा असल्यास त्यांनी पिंटू कोठारी यांना ९८२३१०३१७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, यांच्या या आरोग्य चळवळीचे अनेकांनी कौतुक केले आहे.

खालील व्हिडीओत पहा आयुर्वेदीक काढ्याबाबतची माहिती.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/262518641505788

Protected Content