जंगिपुरा येथील भिवाजी गोपाळ हरवला

शेंदुर्णी ता. जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून नजीकच्याच जंगिपुरा येथील भिवाजी दगडू गोपाळ (वय वर्ष ३३) हा राहते घरुन शेतात कामासाठी पाठवले असता तो घरी अद्याप परत आलेला नाही. कोणालाही भिवाजी गोपाळ हा आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

भिवाजी गोपाळ हा २६ नोव्हेंबर रोजी तो जंगिपुरा येथून निघून गेलेला असल्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फोटो व मिसिंग बाबत बिनतारी संदेशाद्वारे कळविले आहे .सदर व्यक्ती आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन त्यांचे वडील दगडू गोपाळ यांनी केले आहे. सदर कामाच्या बाबतीत पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे हे तपास करीत आहे. तरी सदरची व्यक्ती आढळून आल्यास दगडू गोपाळ मोबाईल नंबर 90 22 12 4704 या वर कळवावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content