जळगाव प्रतिनिधी । शहरातील चौबे शाळेजवळील भिलपूरा येथे सट्टा व जुगार खेळणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखा व शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ७०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील आसोदा रोड इस्लामपूराच्या कोपऱ्यावर सट्टा व जुगाराचा खेळ सुरू नागरीकांची फसवणूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शनीपेठ पोलीसांच्या मदतीने आज १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास कारवाई केली. यात संशयित आरोपी नाजीम शेख नुरमोहम्मद (वय-४०) रा. भिलपूरा, जळगाव याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून ७०० रूपये रोख आणि सट्ट्याचे आकडे खेळण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पो.कॉ. मुकुंद गंगावणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. अनिल कांबळे, पो.ना. विजय पाटील, पो.कॉ. पंकज शिंदे, पो.कॉ. मुकुंद गंगावणे यांनी कारवाई केली.