भिकमचंद जैन नगरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगरातून २० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याप्रकरणी मंगळवार, १६ मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील भिकमचंद नगरात शुभम राजेंद्र शार्दुल वय २५ हा तरुण वास्तव्यास आहेत. त्याचे फर्निचर चे दुकान असून फर्निचर काम करुन उदरनिर्वाह भागवतो. १४ मे रोजी शुभम याने त्याची एम.एच. १९ ए.सी. ०१२२ या क्रमाकांची दुचाकी भिकमचंद जैन नगरात पिताश्री अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकी घेण्यासाठी गेला असता, दुचाकी दिसून आली नाही, सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने मंगळवारी शुभम याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण हे करीत आहेत

Protected Content