बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | प्रत्येक विभागाच्या सेवा वेगळ्या असल्या तरी त्या ग्राहक म्हणूनच समजले जातात, ग्राहक पुढे न येण्याची कारण म्हणजे ग्राहकांमध्ये असलेली भीती असल्याचे प्रतिपादन कला, वाणिज्य, वविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून केले.
प्राचार्य अरविंद चौधरी यांनी पुढे सांगितले की, भारतातील लोकसंख्या ही फार मोठी शक्ती आहे. एक मिनिट जरी भारतातील लोकांनी खरेदी बंद केली तर खूप मोठा परिणाम होईल म्हणून भारत हा एक मोठा ग्राहक आहे. प्रत्येक कार्यालयातून नागरिकांना घरपोच सेवा दिली पाहिजे. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने प्रा. कमलाकर कापसे, गोपीचंद सुरवाडे तालुका अध्यक्ष ग्राहक कल्याण फाउंडेशन, महेंद्र पाटील,जिल्हा अध्यक्ष शेतकरी शेतमजूर पंचायत, संदीप वानखेडे पोलीस नाईक, संतोष निकम अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना व चिन्मय भंगाळे महावितरण यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही म्हणून जागृत असले पाहिजे असे सर्व वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक भागवत गायकवाड तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली तायडे यांनी केले.
निवासी नायब तहसीलदार अरुण भोर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिन कला वाणिज्य कला वाणिज्य बोदवड येथे तहसील कार्यालय बोदवडद्वारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बी. एम. दाते पुरवठा सहाय्यक रवींद्र डांगे उप अध्यक्ष ग्राहक कल्याण फाऊंडेशन, उपाध्यक्ष , योगेश भोई, पंकज चांदूरकर,, बाबुराव गायकवाड, डॉ वंदना नंदवे,प्रा मनोज निकाळजे सर त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.