भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज II / III या लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची   ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने  मान्यता दिली

 

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.  तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर विषाणू संक्रमणाचा धोका वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार आहे.

 

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार असून केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली होती.

 

 

भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. सविस्तर चर्चेनंतर समितीने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर समिती तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची शिफारस करणार आहे. लशीच्या मुलांवर चाचण्या करण्यावर २४ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती त्या वेळी कंपनीला सुधारित वैद्यकीय चाचण्या संचालन प्रक्रिया सादर करण्यास सांगण्यात आले होते.

Protected Content