मुक्ताईनगर, प्रतिनिधी | केंद्र सरकारने सी.ए.ए. आणि एन.आर.सी. हा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजासोबत ८५ टक्के हिंदु समाजातील मोठा घटक व बहुजन समाज बाधीत होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने शांततेत बंद पाळण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा वतीने करण्यात आले होते. त्यास शहरात मोठा प्रतिसाद मिळाला.
शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून भारत बंदमध्ये सहभाग घेतला. शाळा, रुग्णालये, औषध दुकाने, बँका आदी अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंदमुळे इतर व्यवहार ठप्प झाले होते. शहरात बंददरम्यान शांतता ठेवण्यात आल्याने कोणताही अनसुचित प्रकार घडला नाही.
या बंदमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक प्रमोद सौंदडे, जळगाव मणियार बिरादरीचे उपअध्यक्ष हकीम चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, शकील मेंबर, माजी सरपंच जाफर अली, आसिफ शेख, असगर शेख, बहुजन मुक्ती मोर्चाचे ब्रिजलाल इंगळे, भारत मुक्ती मोर्चाचे राजू वानखेडे, बेरोजगार मोर्चाचे सुपडा हिरोले, युवा मोर्चाचे सिध्दार्थ इंगळे, बहुजन क्रांती मोर्चाचे अरुण जाधव, बाम सेफ कार्यकर्ता मनोज पोहेकर, राष्ट्रीय किसान मोर्चाचे कैलास पाटील,
छत्रपती क्रांती सेनेचे राहुल हरणे, बहुजन मुक्ती मोर्चाचे संजू इंगळे, बी.एफ.चे विशाल जवान,
रफिक सलाम, कलिम मणियार, मुशीर मणियार, मोहन मेंडे, शकूर जमादार, नवाब किंग फाऊंडेशनचे अरबाज खान, लब्यक फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जूबेर अली व मिलत ग्रूपचे शोएब पठाण, सर्व पदाधिकारी यांनी बंद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. मुस्लिम समाजाच्या सर्व लोकांनी या बंद मध्ये सहभाग घेतला. दरम्यान, मुक्ताईनगर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष होते. तसेच बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदमध्ये सहकार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांना गुलाब पुच्छप देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा तसेच मणियार बिरादरीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.