नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत जगात करोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिललाही मागे टाकलं आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत भारतापुढे आता केवळ अमेरिकाच आहे.
अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा हा ६२ लाखांच्या पार पोहोचला आहे. तर १ लाख ८७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २२ लाख ८३ हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. तर या देशात अद्याप ३७ लाखांहून अधिक करोनाबाधित लोक आहेत. ब्राझिलमध्ये बाधितांचा आकडा हा ४१ लाखांच्या जवळपास आहे. तर १ लाख २५ हजारांहून अधिक लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
ब्राझीलमध्ये ३४ लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत. तर ५ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. शनिवारी रात्री राज्यांकडून आलेल्या आकडेवारीनंतर भारताने ब्राझिलला मागे टाकल्याचे समोर आले.