जळगाव प्रतिनिधी । माजी उपमहापौर भारती कैलास सोनवणे या पुढील महापौर बनणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले असून त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माजी उपमहापौर भारती कैलास सोनवणे यांच्या नावाला आ. गिरीश महाजन यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता त्या या पदावर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट आहे. या वृत्ताला कैलास सोनवणे यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, भारती सोनवणे या आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे आणि भाजपचे सर्व स्वीकृत नगरसेवकदेखील आपापल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.