भारतीय संशोधकांनी कोरोना विरोधातील उपचार शोधला

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जगात कोरोना विषाणूंवर लशींचे संशोधन करण्यात येत असतांना भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू विरोधातील प्रभावी असा उपचार शोधून काढला. या उपचाराच्या क्लिनिकल ट्रायललाही मंजुरी मिळाली आहे.

आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून हे अँटिसेरा विकसित केलं आहे.  आम्ही घोड्याचं सेरा तयार केलं आहे. घोड्यांवर सेराचा अभ्यासही पूर्ण केला आहे. आम्हाला आता याच्या क्लिनिक ट्रायलसाठी परवानगी मिळाली असल्याची आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान, आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून एक अँटिसेरा विकसित केलं आहे. ज्याच्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. अँटिसेरा हे एक ब्लड सीरम असून यामध्ये एखाद्या विशेष आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं प्रमाण अधिक असतं. कोणत्याही विशेष संक्रमणाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं.

Protected Content