जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी घोषित केलेल्या कार्यकारणीत मूळ चाळीसगाव येथील कपिल शिवाजीराव पाटील यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
कपिल पाटील गेल्या १२ वर्षापासून भाजपामध्ये सक्रीय कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष, अध्यक्ष व चाळीसगांव भाजपाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भाजयुमोने जिल्ह्यात अनेक आंदोलने, एल्गार मेळावा, सी.एम.चषक यशस्वीपणे राबविली. जळगाव लोकसभा मतदार संघाचे युवा मोर्चा प्रभारी व लाभार्थी संपर्क प्रमुख म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.
सामाजिक क्षेत्रात कपिल पाटील हे खान्देश ग्रामीण विकास प्रतिष्ठान व कै.अण्णासाहेब एस.एल.पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कपिल पाटील हे चाळीसगांव तालुक्यातील बहाळ या छोट्या गावातून पुढे आलेले बी.ई.(सिव्हील) असे उच्च शिक्षित युवा नेतृत्व आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजीमंत्री गिरीश महाजन, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, खा.उन्मेश पाटील, खा.रक्षा खडसे, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, आ. मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंदुलाल पटेल, माजी आ. स्मिता वाघ, डॉ.गुरुमुख जगवानी, महापौर भारती सोनवणे आदिंसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.