यावल, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक अॅड. अतुल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अॅड. साळवे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
अॅड. अतुल साळवे यांनी बैठकीत सांगितले की, अनुसूचित जाति मोर्चाच्या कार्यकर्ता हा समाजातील ज्या घटकांच्या विकासासाठी झाला पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा समाजातील गरिबांना फायदा मिळाला पाहिजे त्यासाठी काम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या जयंतीला समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन केले गेले पाहिजे. अवैध पद्धतीने होणाऱ्या धर्मांतर विषयी कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन रोखली गेली पाहिजे या व इतर अशा अनेक मुद्द्यांवर अॅड. अतुल साळवेयांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस नागेश्वरसाळवे यांनी केले. बैठकीला सुबोध वाघमारे, ज्योती निंभोरे, संजय मोरे, दीपक हरी सोनवणे, संजय डांबरे, संदीप सुरवाडे, सिद्धार्थ तायडे, प्रशांत निकम, योगेश जोहरे, अमर निकम व डॉ. क्षितीज भालेराव आदी उपस्थित होते. आभार सुबोध वाघमारे यांनी मानले