जळगाव, प्रतिनिधी । आज सोमवार दि. ६ एप्रिल रोजी आमदार सुरेश भोळे व जिल्हा अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पक्षाचे ध्वजारोहण आ. भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्ताने वसंत स्मृती भवनात सकाळी १० वाजता भारत माता, पंडित दिनदयाल, डॉ. शामा प्रसाद याच्या प्रतिमेचे पूजन दिपक सुर्यवंशी यानी केले. याप्रसंगी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, नगरसेवक राजेंद्र मराठे, जिल्हा पदाधिकारी प्रकाश पंडित, गणेश माळी, मंडल पदाधिकारी दिनेश पुरोहित, संजय शिंदे, निलेश पवार, शांताराम गवंडे, गणेश पाटील उपस्थित होते. कोरोना वायरस रोखण्यासाठी भाजपार्टीच्या ९ मंडलात पदाधिकारीमंडल अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा फडकवुन व गरजु गरीब लोकांना अन्नं दानाचे पाकिट वाटप केले.