Home Uncategorized भारतीय जनता पक्षातर्फे बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

भारतीय जनता पक्षातर्फे बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

0
67

जळगाव, प्रतिनिधी | खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहिणाबाई उद्यान येथे त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या मंडळ क्र.४ तर्फे अभिवादन करण्यात आले.

 

भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माजी महापौर सीमा भोळे, स्थायी समितीच्या माजी सभापती सुचीता हाडा, महानगर चिटणीस प्रा. भगतसिंग निकम, सोशल मीडियाचे अक्षय चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, सुरेखा पाठक, मंडळ अध्यक्ष अजित राणे, चेतन तिवारी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound