भारतीय किसान संघातर्फे १९ डिसेंबरला दिल्लीत किसान गर्जना रॅली (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भारतीय किसान संघ १९ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ल्लीतील रामलिला मैदानावर लाखोंच्या संख्येने शेतकरी देशव्यापी किसान गर्जना रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन यांनी १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

भारतीय किसान संघातर्फे पुढील प्रमुख पाच मागण्यांसाठी दिल्ली येथे रामलीला मैदान येथे दि. १९ डिसेंबर रोजी देशव्यापी किसान गर्जना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅली जिल्हाभरातून जवळपास ४ ते ५ हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या आहेत प्रमुख मागण्या : सरकार कृषी निविष्ठां जसे खते बियाणे औजारे वरील भरलेला जीएसटी, क्रेडीट इनपुट देणार नसेल तर निविष्ठावर जीएसटी आकारू नये. कारण शेतकरी अन्ननिर्मितीसाठी निविष्ठा वापरतो, तो अंतिम ग्राहक नाही. तसेच किसान सन्मान निधीमध्ये पुरेशी वाढ व्हायला हवी. कारण, आज शेतकर्‍याचे उत्पन्न मजुराच्या उत्पन्नापेक्षाही कमी आहे. शेतकरी कुटुंबे कर्जाखाली दबली गेली आहेत.  रासायनिक खतांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये प्रति एकराच्या प्रमाणामध्ये डीबीटीद्वारे देण्यात यावे.  आदी मागण्या भारतीय किसान संघातर्फे करण्यात आल्या आहेत.  तरी शेतकर्‍यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये  लाखोंच्या संख्येने  सहभागी होण्याचे आवाहन भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, जिल्हा मंत्री डॉ.दिपक पाटील यांनी केले आहे.

Protected Content