नेपियर वृत्तसंस्था । बलाढ्य ऑस्ट्रेलियावरील विजयाने उत्साह दुणावलेल्या टिम इंडियाने न्यूझिलंडला पहिल्या एक दिवसीय सामन्यात आठ गड्यांनी हरविले आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण ३८ ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १५७ धावांवर बाद झाला. केन विल्यम्सनने सर्वाधिक ६१ धावा केल्या. भारताच्या कुलदीप यादवने सर्वाधिक ४ तर मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. केदार जाधवलाही एक बळी मिळाला. शमीने गुप्टिलला आऊट करत वन डेमध्ये १०० विकेट पूर्ण केल्या. सर्वात कमी मॅचमध्ये १०० विकेट घेणारा फलंदाज तो ठरला आहे. त्याने इरफान पठानच्या ५९ मॅचमध्ये १०० विकेटचा विक्रम मोडीत काढला. यानंतर न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा लवकर बाद झाला. पण धवनने एक बाजू लढवत ठेवली होती. तसेच कोहलीनेही त्याला चांगली साथ दिली. कोहलीचे अर्धशतक अवघ्या ५ धावांनी हुकले. तो ४५ धावांवर बाद झाला. तर धवनने नाबाद ७५ धावा ठोकल्या.