Home आरोग्य भारतात पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ

भारतात पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ

0
31

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात गेल्या २४ तासांत पुन्हा या वर्षातील सर्वाधिक म्हणजे  ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात लागण होण्याचा हा या वर्षातील उच्चांक आहे. 

 

१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे. शुक्रवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले होते. 

 

शुक्रवारच्या तुलनेत देशात शनिवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे.  गेल्या २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे.  ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचं लसीकरण झालं आहे.

 

 

३० जानेवारीला भारतात सर्वात पहिला  रुग्ण सापडला होता. सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक आहे.  सर्वाधिक कोरोना फटका बसलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.


Protected Content

Play sound