भारतात कोरोना रूग्णांची संख्या 43 वर !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ आणि जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाचे अनेक रूग्ण सापडले आहे. देशात आता कोरोना रूग्णांची संख्या 43 वर गेली आहे.

 

सध्या भारतात कोरोना थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या १२ तासात नऊ घटना समोर आल्या आहेत. रविवारी केरळमधून कोरोनाचे पाच रूग्ण आढळून आले होते. आतापर्यंत दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, हरियाणा, लडाख आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रूग्ण समोर आले होते. या 43 रूग्णांपैकी 16 विदेशी नागरिक आहे आणि तीन रूग्ण जे केरळमधून आले होते ज्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Protected Content