भारतात कोरोनातुन बरे झालेल्या लोकांना लसीची एकच मात्रा देणार

 

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीच्या  दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून पुढे आली आहे

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीने  ही  दिलासादायक बाब समोर आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे.

 

 

त्यामुळे आता भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना लसीकरणाची रणनीती बदलली जाणार का, हे पाहावे लागेल. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली

 

 

या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांसह स्वतंत्र पदभार असलेले आणि राज्यमंत्रीही सहभागी  होते . पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली  बैठकीत विविध राज्यातील  परिस्थितीचा आढावा  घेतला गेला  रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा  झाली

 

काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content